जिल्हा

ठामपा कर्मचाऱ्यांना हवे २० टक्के अनुदान

ठामपा कर्मचाऱ्यांना हवे २० टक्के अनुदान
ठामपा कर्मचाऱ्यांना हवे २० टक्के अनुदान फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांना एकूण उत्पन्नाच्या २०टक्के दिवाळी बोनस देण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना यांना या आर्थिक वर्षासाठी अनुग्रह अनुदान देण्याचे मागणी पत्र ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनच्यावतीने महानगरपालिका प्रशासनात सादर करण्यात आले. मागिल काही वर्षात महापालिकेतील मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या आजच्या घडीला २८ लाखाच्या वर गेली असून त्यामानाने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. अशा स्थितीतही सध्या कार्यरत अधिकारी कर्मचारी अत्यंत जोमाने काम करत असून त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ घडवून आणली आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतही नागरिकांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आणि महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना या आर्थिक वर्षाच्या एकूण वित्तलब्धीचा २० टक्के रक्कम अनुदान म्हणून अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढण्याची विनंती आयुक्त श्री. राव यांना करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोणकर, उपाध्यक्ष बालू मुंडे, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, चिटणीस नरेश पाटील, सुरेश इंगळे, कैलास पवार, बाळाराम महाडिक, उत्तम रामगुडे, संतोष चव्हाण, मोहन जगदाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव मनोहर, कुणाल मते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475