जिल्हा

ठामपा लिपिकास लाच प्रकरणी अटक

ठामपा लिपिकास लाच प्रकरणी अटक
ठामपा लिपिकास लाच प्रकरणी अटक फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा कौसा दिवा उपप्रभाग कार्यालयातील लिपिक वर्ग क्र. तीनच्या कर्मचाऱ्यास लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गिरीश अहिरे असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने या कामी खासगी इसमाची मदत घेत नऊ हजार रुपयांची लाच मागितली होती. पण तडजोडीअंती आठ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारली. या गुन्ह्यात अहिरेला मदत करण्यासाठी असीम इनायत शरीफने मदत केली. या गुन्ह्यांमध्ये अहिरे आणि शरीफने तक्रारदाराच्या मुलाचे नाव टॅक्स पावतीवर समाविष्ट करण्यासाठी नऊ हजार रुपये मागितले होते. अखेरीस तडजोडीनंतर आठ हजार ५०० रुपयांवर ‘सौदा’ठरला. मात्र, तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मंगळवारी, २२ आॅगस्ट रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार दिली. पडताळणी कारवाईत तक्रारदारांनी त्यांच्या मुलाच्या नावे नव्याने घेतलेल्या फ्लॅटच्या टॅक्स पावतीवरील नावात बदल करण्याकरीता लोकसेवक गिरीश अहिरे याने तक्रारदारांकडून प्रथम नऊ हजार रुपयांची लाच मागितली,नंतर तडजोडीअंती ८ हजार ५०० रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी अहिरे आणि असीम यांना ८ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना लोकसेवक आणि खाजगी सेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी एसीबीच्या ठाणे परिक्षेत्रचे पोलीस अधिक्षक सुनिल लोखंडे आणि अतिरिक्त अधिक्षक अनिल घेरडीकर यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475