जिल्हा

ठाकरे-पवार भेटीने उलट सुलट चर्चा

ठाकरे-पवार भेटीने उलट सुलट चर्चा
ठाकरे-पवार भेटीने उलट सुलट चर्चा फोटो: ठाणे वैभव
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतल्याने महविकास आघाडीत आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने अदाणी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत जेपीसी चौकशीची मागणी केली होती. पण शरद पवारांनी जेपीसी चौकशीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून चौकशी झाली तर योग्य राहिल, असे विधान शरद पवारांनी केले. यानंतर अलीकडेच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ‘फडतूस-काडतूस’ वादावरून उद्धव ठाकरेंसह फडणवीसांचे कान टोचले. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास घाई केली. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा केली नाही, असे विधान पवार यांनी केले. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. महाविकास आघाडीमध्ये खदखद सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या. या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत साऱ्यांची उत्कंठा वाढली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475