जिल्हा

डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश
डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : डोंबिवलीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
डोंबिवलीतील प्रकाश तेलगोटे हे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. दीपेश म्हात्रे ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना तेलगोटे ठाकरे गटाचे डोंबिवली शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पालिका निवडणूक काळात दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कालावधीत तेलगोटे यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले होते. ठाकरे गटात राहून काम करणे शक्य नसल्याची जाणीव झाल्यावर तेलगोटे आणि त्यांच्या समर्थकांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा झेंडा हातात देऊन तेलगोटे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गावमंदिर सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक शशिकांत कांबळे, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, सरचिटणीस प्रशांत पटेकर, हरी सावंत उपस्थित होते. शशिकांत कांबळे यांच्यानंतर आंबेडकर चळवळीतील तेलगोटे यांच्यासारखा तगडा कार्यकर्ता भाजपमध्ये आल्याने भाजपची या समुहातील ताकद वाढली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475