जिल्हा

तरुणीची काढली छेड; रिक्षा चालकास बेड्या

तरुणीची काढली छेड; रिक्षा चालकास बेड्या
तरुणीची काढली छेड; रिक्षा चालकास बेड्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे : घराकडे पायी चालत जाणाऱ्या 23 वर्षीय पीडित तरुणीची 20 वर्षीय रिक्षा चालकाने भररस्त्यात अडवून छेड काढल्याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. साहील पठाण (20) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी भिवंडी शहरातील एका परिसरात कुटुंबासह राहत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. पीडित तरुणी कंपनीमधील काम आटपून 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील नुरी मस्जिदजवळून जात होती. त्यावेळी आरोपी साहिलने पीडितेला भर रस्त्यात अडवले. त्यामुळे याचा जाब पीडितेने रिक्षा चालकाला विचारून ती घरच्या दिशेने जात होती. यावेळी पीडिता घराजवळ पोहोचल्यानंतर रिक्षा चालकाने पुन्हा तिची छेड काढली. हा प्रकार पीडित तरुणीच्या वडिलांना दिसल्याने त्यांनीही रिक्षा चालकास जाब विचारला. या गोष्टीचा राग येऊन त्याने पीडितेच्या वडिलांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तिथं असलेल्या पाण्याच्या मोटारवर ठेवलेला लोखंडी पत्र्याचा तुकडा उचलून वडिलांवर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. तसेच तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 14 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा चालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर देसाई करत असल्याचंही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475