जिल्हा

मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी खा. शिंदेंवर

मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी खा. शिंदेंवर
मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी खा. शिंदेंवर फोटो: ठाणे वैभव
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी पांडुरंग पाटील, अहिल्यानगरसाठी शिवसेना सचिव राम रेपाळे, बुलढाणा संजय सोनार, बीड मनोज शिंदे, सांगली योगेश जानकर, सातारा शरद कणसे, रत्नागिरी राजेश मोरे आणि सिंधूदुर्ग मतदारसंघासाठी बाळा चिंदरकर यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475