जिल्हा

सर्पदंशाने मावशी भाची मृत्यूप्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई

सर्पदंशाने मावशी भाची मृत्यूप्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई
सर्पदंशाने मावशी भाची मृत्यूप्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई फोटो: ठाणे वैभव
कल्याण: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात साप चावल्याने एकाच घरातील तरुणी मावशीसह चिमुकल्या भाचीचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून मोठा हलगर्जीपणा झाला असल्याची बाब उघडकीस आली. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार याप्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने रुग्णालयातील चार जणांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानुसार दोन कर्मचाऱ्यांना निलंबित, एकाला कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे तर रुग्णालय प्रमुखांचा पदभार काढून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव, परिचारिका प्रमुख शारदा गोडसे यांचा समावेश आहे. कक्ष कामगार आशीष कांबळे यांना कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांच्यावर पर्यवेक्षकीय काम ढिलाईने केल्याचा ठपका ठेवत त्यांचा पदभार काढून वेतनवाढ रोखली आहे. बाल अतिदक्षता विभाग चालवणाऱ्या अल्पाईन डायग्नोसिस या बाह्यस्त्रोत संस्थेनेही हलगर्जीपणा केल्याचे आढळल्याने त्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या देयकातील 50 टक्के रक्कम दंड स्वरूपात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475