जिल्हा

महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात घडली आहे. शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास बदलापूर पश्चिम भागातील एका इमारतीत हा प्रकार घडला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मुंबई पोलिस दलातील ३६ वर्षीय महिला पोलिस कॉन्स्टेबलने रात्री ड्युटीवरून घरी परतल्यानंतर राहत्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेने आत्महत्या करण्यामागे नेमके कोणते कारण होते, याचा पोलिस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475