जिल्हा

समाज मंदिरात शिक्षण घेणाऱ्या दोन जणांचे अभिमानास्पद यश

समाज मंदिरात शिक्षण घेणाऱ्या  दोन जणांचे अभिमानास्पद यश
समाज मंदिरात शिक्षण घेणाऱ्या दोन जणांचे अभिमानास्पद यश फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: समाज मंदिरातून शिक्षण घेऊन तेजस राधे आणि लक्ष्मण केंगार या दोघांची उच्च पदांवर नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथच्या भास्करनगर येथे काही वर्षांपूर्वी समाज मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. याच समाजमंदिराच्या माध्यमातून सुमारे 22 विद्यार्थ्यांनी विविध पदांवर नियुक्ती प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे समाज मंदिराची परंपरा शैक्षणिक दृष्ट्या वाखाणण्याजोगी झाल्याचे नगरसेवक वाळेकर यांनी सांगितले.
याच समाज मंदिरातून शिक्षण घेतलेल्या तेजस राधे यांची राज्य राखीव पोलिस दलामध्ये तर श्रीधर केंगार यांची नीट गोवा अंतर्गत टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल नगरसेवक वाळेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
समाज मंदिरातून शिक्षण घेऊन राधे आणि केंगार या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशामुळे भास्करनगर परिसराबरोबर अंबरनाथ शहराचा गौरव वाढला असल्याची भावना नगरसेवक वाळेकर यांनी व्यक्त केली.
भास्कर नगरसारख्या मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या वस्तीत उभारण्यात आलेले समाज मंदिर सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे केंद्र बनले आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची सुविधा आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे कार्य या समाज मंदिराच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे मिळते असे प्रतिपादन नगरसेवक वाळेकर यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475