जिल्हा

चिखलामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले; पण दुर्दैवाने मृत्यू

चिखलामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले; पण दुर्दैवाने मृत्यू
चिखलामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले; पण दुर्दैवाने मृत्यू फोटो: ठाणे वैभव
ठाणे : खाडीतील चिखलामध्ये अडकलेल्या व्यक्तीला ठाणे रेल्वे पोलिसांनी बाहेर काढले पण दुदैवाने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. ही घटना १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे यासंबंधी माहिती प्राप्त झाली. घटनेची माहिती देणा-या स्वप्नील नाखवा हे कोपरी पूर्व चेंदणी कोळीवाडा रेल्वे बोगद्याजवळ राहतात. या ठिकाणी कोपरी खाडीमध्ये एक अज्ञात पुरुष व्यक्ती (२० ते २५ वर्षे) खाडीतील चिखलामध्ये अडकली होती, असे सांगण्यात आले. त्यांनी त्वरेने घटनास्थळी पोहचून ठाणे महापालिकेला माहिती कळवली. त्यानंतर ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी, ठाणे रेल्वे स्ट्रेचर हमाल, अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहन आणि एका जीप वाहनासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह उपस्थित होते. त्यावेळी काळोख पडला असल्यामुळे, चिखलामध्ये अडकलेली अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती. लगेचच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून खाडीमधील चिखलात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि मध्य रेल्वे पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी रुग्णवाहिकेमधून संबंधित व्यक्तीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले होते. ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीवर अतिदक्षता विभागामध्ये दाखल करुन उपचार सुरू होते. मात्र त्या, व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. सकाळी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असे ठाणे रेल्वे पोलिसांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475