जिल्हा

शुक्रवारीही पावसाची दमदार हजेरी

शुक्रवारीही पावसाची दमदार हजेरी
शुक्रवारीही पावसाची दमदार हजेरी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी ही जोरदार हजेरी लावली. यामध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत ३३.७६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये तीन ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून घर,दुकानाचे पत्रे फुटून आणि दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. मुंब्र्यात नाल्याच्या भिंतीसह त्यावर बांधलेल्या घराची भिंत पडली आहे. गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही पावसाने हजेरी लावली. पहिल्या तीन तासात अवघा ००.७५ मिमी पाऊस झाला होता. मात्र नंतरच्या तीन तासात ३३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये साडेबारा ते दीड या एक तासात जोर अचानक वाढला. या एक तासात १७.५२ मिमी पावसाची नोंद झाली. याचदरम्यान शहरातील फ्लॉवर व्हॅली येथे दोन चारचाकी गाड्यांवर तर कॅसल मील परिसरात तीन दुकानांवर तसेच आंबेडकर रोड येथे एका घरावर झाड कोसळून छताचे पत्रे आणि गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच मुंब्रा, राणानगर, रेतीबंदर, या ठिकाणी नाल्याची अंदाजे २० फूट लांब आणि चार फूट उंच सुरक्षा भिंत पडली आहे. नाल्याच्या भिंतीवर बांधलेल्या घराची भिंत सुध्दा पडली आहे. भिंत पडून धोकादायक स्थितीत असलेले घर मुंब्रा प्रभाग समितीमार्फत बंद करण्यात आले असून या घटनांमध्ये कोणालाही सुदैवाने दुखापत झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475