जिल्हा

स्टेमचा कर्मचारी जखमी

स्टेमचा कर्मचारी जखमी
स्टेमचा कर्मचारी जखमी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू असताना शहाड स्टेम कंपनीचे कर्मचारी अर्जुन आवळे (53) ह्यांना विजेचा धक्का बसल्याची घटना घडली. स्टेम कंपनीने जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी २४ तासांचा शट डाऊन घेतला होता. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्तीचे काम शहाड येथे सुरू असताना स्टेम कंपनीचे अर्जुन आवळे या कर्मचार्‍याला इलेक्ट्रिकल शॉक लागून तो जमिनीवर कोसळला . मात्र इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना बाजूला करून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आवळे हे ५० टक्के भाजले असून त्यांच्यावर कल्याण येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आवळे यांची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475