जिल्हा

बहिणीच्या सासरी वेशांतर करून दीड कोटींची चोरी

बहिणीच्या सासरी वेशांतर करून दीड कोटींची चोरी
बहिणीच्या सासरी वेशांतर करून दीड कोटींची चोरी फोटो: ठाणे वैभव
बारा तासात महिला आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक वसई : वसई पश्चिमेतील शास्त्री नगर येथे घडलेल्या दीड कोटींचे दागिने चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. यातील आरोपी महिलेला गुजरात नवसारी येथून अटक करण्यात आली आहे. ज्योती भानुशाली (२७) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनेच्या बहिणीनेच वेशांतर करून चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास वसई पश्चिमेच्या शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या ओधवजी भानुशाली (६६) हे घरात एकटे होते. याच दरम्यान घर भाड्याने हवे असल्याचा बहाणा करून एक अज्ञात इसम घरात शिरला होता. यानंतर त्याने बाथरूमला जाण्याचा बहाणा केला. तिथे गेल्यानंतर तुमच्या बाथरूमला गळती लागली असल्याचे सांगितल्याने वृद्धही त्या ठिकाणी गेला व त्या वृद्धाला स्वच्छतागृहात डांबून ठेवले. त्यानंतर चोरट्याने घरातील दीड कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासातच आरोपी महिलेला गुजरात नवसारी येथून अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेला दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुरुषाचे रूप धारण करून चोरी ज्योती भानुशाली ही ओधवजी भानुशाली यांच्या मोठ्या सुनेची बहीण आहे. ज्योती हिला शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांचा तोटा झाला होता. याशिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध ठिकाणाहून कर्जही घेतले होते. ते कर्ज चुकते करण्यासाठी तिने आपल्या बहिणीच्या घरी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475