जिल्हा

भाईंदर ते गायमुख सुपरफास्ट मार्गास राज्य शासनाची मंजुरी

भाईंदर ते गायमुख सुपरफास्ट मार्गास राज्य शासनाची मंजुरी
भाईंदर ते गायमुख सुपरफास्ट मार्गास राज्य शासनाची मंजुरी फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाला गती देण्यासाठी भाईंदर ते घोडबंदर मार्गा वरील गायमुख दरम्यान नवीन मार्ग बांधण्याच्या कामास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने बोरिवली ते ठाणे दरम्यान भुयारी जलद मार्गा चा पर्या य उपलब्ध करून दि ल्यानंतर मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या जलद प्रवासाचा पर्या य उपलब्ध करून देण्याचा निर्ण य घते ला आह.े या प्रकल्प ांतर्गत भाईंदर ते गायमुख दरम्यान नवीन वाहतुकीचा पर्या य उपलब्ध करून देण्यात येणार असून गायमुख ते ठाणे दरम्यानच्या वाहतुकीसाठी तेथील उड्डाणपूल तसेच रुंद रस्त्यावरून वाहतूकीला गती दि ली जाणार आह.े मुंबईहून ठाणे येथे प्रवास करणाऱ्या वाहनांना तेथील भुयारी मार्गा चा वापर करता येणार असल्याने बोरिवली ते दहिसर चेकनाकामार्गे ठाणे येथे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे. त्या मुळे फाऊंटन ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाला रस्ता मोकळा राहणार असल्याचा दावा के ला जात आह.े भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या वाहतुकीला गती देण्यासाठी राज्य शासनान े भाईंदर त े फाऊं टन हॉटले जंक्शनपर्यंत ९.५८ किमी अं तराचा उन्नत खाडी पूल बांधण्याचा निर्ण य घेतला आहे. पुढे फाऊं टन ते गायमुख दरम्यान ५.८६ किमीचा भुयारी मार्ग बाधं ण्यात यणे ार आह.े या एकू ण १५.४४ किमीच्या अंतरासाठी तब्बल १७ हजार ३६ कोटी ३० लाख रुपये खर्च यणे ार आह.े या खर्चा सह प्रकल्पाच्या सविस्त र प्रकल्प अहवालास २२ जून रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता दि ल्याने भाईंदर ते ठाणे दरम्यानचा प्रवास सुसाट होण्याची शक्यता वर्तवि ली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षां चा कालावधी लागणार असून तो बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) तत्वावर साकारण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475