जिल्हा

नालेसफाईला सुरूवात; मेअखेरपर्यंत मोहीम फत्ते

नालेसफाईला सुरूवात; मेअखेरपर्यंत मोहीम फत्ते
नालेसफाईला सुरूवात; मेअखेरपर्यंत मोहीम फत्ते फोटो: ठाणे वैभव
* ठामपा आयुक्तांची पाहणी * अधिकाऱ्यांना दिले निर्देश ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास सोमवारपासून सुरूवात झाली आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी, मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काम २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदविण्यात यावी. तसेच, संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. नाल्यातून उचललेला गाळ तत्काळ उचलला जावा. त्यामुळे दुर्गंधी पसरू नये, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशनलगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. त्यावेळी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला. पाठोपाठ, रेल्वे मार्गालगत, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपान भाईक, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा-कोपरी, उथळसर, माजिवडा-मानपाडा, दिवा आणि कळवा या पाच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात, मुंब्रा, लोकमान्य नगर-सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475