जिल्हा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एसएसटीची चमक

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एसएसटीची चमक
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एसएसटीची चमक फोटो: ठाणे वैभव
त्रिशा नायरला रिले स्पर्धेत रौप्य पदक
कल्याण : राजस्थान येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सची विद्यार्थिनी त्रिशा नायर हिने उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ४×१०० मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. या कामगिरीमुळे एसएसटीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
स्पर्धेत देशभरातील नामांकित विद्यापीठांतील धावपटूंमध्ये त्रिशाने तगड्या स्पर्धेला सामोरे जात आपल्या संघाला निर्णायक टप्प्यावर महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तिच्या वेग, कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाचे हे सर्वोत्तम फलित असल्याचे क्रीडा विभागाने सांगितले.
एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्रिशाचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या यशाचा गौरव केला. भविष्यातही ती अशाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्रिशाच्या या यशामुळे एसएसटी महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475