जिल्हा

ठाण्याची सोनल जेट्टी हिला दोन सुवर्णपदके

ठाण्याची सोनल जेट्टी हिला दोन सुवर्णपदके
ठाण्याची सोनल जेट्टी हिला दोन सुवर्णपदके फोटो: ठाणे वैभव
ठाणे : वर्ल्ड फूनाकोशी शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनतर्फे १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सोनल जेट्टी हिने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, रशिया, कजाकिस्तान, नेपाळ, मॉरिशियस, कुर्जिजस्तान, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, इटली, दुबई, पोर्तुगाल, केनिया, मलेशिया, जपान, इंग्लंड, इराण, अबुधाबी, भूटान, साउथ अरब इत्यादी देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सुमारे २००० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कुमारी सोनल जेट्टी हिने महिला वयोगट १२-१३ या गटात भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदके मिळवली. सोनलचे प्रशिक्षक जहीर शेख, सलीम अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनल प्रशिक्षण घेत आहे. सोनल जेट्टी हिला १७ नोव्हेंबर २०२४ विरार येथे २०२४ महाराष्ट्र उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार विशाल जाधव (निर्देशक,महासचिव महाराष्ट्र खेळ पुरस्कार समिती ) आणि राजकपूर बागडी (अध्यक्ष महाराष्ट्र खेल पुरस्कार समिती) यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी सोनलचे प्रशिक्षक सलीम अन्सारी हे ही उपस्थित होते. सोनल ही ठाणे येथील खारटन रोड ठाणे येथे राहते, आणि ती ठाणे येथील मो. ह. विद्यालय ठाणे शाळेची विद्यार्थिनी असून इयता ९ वीमध्ये शिकत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475