महाराष्ट्र

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी मैत्री निभावली - म्हस्के

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी मैत्री निभावली - म्हस्के
राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी मैत्री निभावली - म्हस्के फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नगरसेवकांचे आभार मानले आहेत. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नगरसेवकांनी अप्रत्यक्षपणे मैत्री निभावली, अशी पोस्ट म्हस्के यांनी समाज माध्यमांवर केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. परंतु त्यातील मजकुरामुळे या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि ठाण्याचा महापौर म्हणून गेली वीस वर्षे काम करत होतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे महापालिकेतील कारकीर्द माझी यशस्वी ठरली. महापालिकेतील सर्वच नगरसेवक माझ्या पाठीशी उभे राहिले, मी घेत असलेल्या निर्णयांना वेळोवेळी पाठिंबा दिला, त्यामुळे ठाण्याचा प्रथम नागरिक महापौर या नात्याने मी शहरात यशस्वीपणे काम करू शकलो, कोविडच्या काळातही आपण सगळ्यांनी मिळून ठाणेकरांना दिलासा देणारे काम केले, असे म्हस्के यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेषत: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष, आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट आणि मनसे यांनी मदत केली त्यामुळे ही निवडणूक मला यशस्वीपणे प्रचंड मताधिक्याने जिंकता आली. अर्थात काहींना पक्षीय बंधनामुळे थेट मैदानात उतरून प्रत्यक्षपणे मदत आणि प्रचार करता आला नाही. पण माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मैत्री निभावून अप्रत्यक्षपणे मला निवडून आणण्याकरिता मदत केली. त्यामुळेच मला प्रचंड मताधिक्य ‍मिळाले. या त्यांच्या पोस्टमुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475