जिल्हा

लाच मागितल्याने सहा. पोलीस निरीक्षकावर गुन्हा

लाच मागितल्याने सहा. पोलीस निरीक्षकावर गुन्हा
लाच मागितल्याने सहा. पोलीस निरीक्षकावर गुन्हा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणेनगर वाहतूक शाखेत सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले रविंद्र चव्हाण यांनी दोन हजार रुपयांची मागणी केल्याबद्दल आलोसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र चव्हाण (५७) हे तत्कालिन उपनिरीक्षक आणि सध्या ठाणेनगर वाहतूक शाखेत (वर्ग तीन) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदारांचा चुलत भाऊ हा रिक्षा भाडेतत्वावर चालवण्यास देतो. त्यांच्याकडे असलेल्या रिक्षेचे देखभाल खर्च हे तक्रारदार करतात. त्यांनी रिक्षा एका चालकाला भाडेतत्वावर दिली आहे. ९ मार्च २३ रोजी संबंधित चालकाकडे परवाना आणि बॅच नसल्यामुळे लोकसेवक एएसआय चव्हाण यांनी नौपाडा ट्रॅॅफिकमध्ये रिक्षा जमा करुन ठेवली व मालकाला बोलावण्यास सांगितले. लोकसेवकाने तक्रारदारांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम २१ मार्च २३ रोजी बोलावले होते. त्यांना पैसे रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी त्याच तारखेला ठाणे एसीबीमध्ये तक्रार दिली होती. तक्रारदारांच्या रिक्षाचालकाकडे लायसन्स व बॅच नाही म्हणून रिक्षा नौपाडा वाहतूक शाखेत जमा करण्यास सांगितले. तक्रारदारांना बोलावून त्यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी लगेच स्विकारण्याचे मान्य केले. लाचेची मागणी केल्याबद्दल आलोसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नेमणुकीला असलेले चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475