महाराष्ट्र

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार फोटो: ठाणे वैभव
पंढरपूर: ज्या घरात संत नामदेव महाराज यांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नामदेव महाराजांचे 16 वे, 17 वे आणि 18 व्या वंशजांकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा झाला असून संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी आणि वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते. भक्तशिरोमणी श्री संत नामदेवांचे सोळावे वंशज केशव महाराज, माधव महाराज, कृष्णदास महाराज, मुकुंद महाराज हे असून निवृत्ती महाराज, हरी महाराज, एकनाथ महाराज, विठ्ठल महाराज आणि हरी महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी होते. विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. संत नामदेव महाराज यांच्या तीन पिढ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांचा हा सन्मान करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण नामदेवांचा वाडा फुलांनी सजविण्यात आला आहे. ज्या विठ्ठल मूर्तीला संत नामदेव रोज जेवण दिल्याशिवाय स्वतः भोजन करत नव्हते त्याच केशवराज मूर्ती समोर हा सत्कार सोहळा झाला आहे. संत नामदेव महाराज यांची पगडी, सन्मानपत्र, वीणा, सन्मानचिन्ह, तुळशीहार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करतेवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर वारकऱ्याकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. विशेष म्हणजे पंढरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी देखील हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475