जिल्हा

श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश

श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश
श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश फोटो: ठाणे वैभव
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाने घेतलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये मुंबईतील श्रेयश दीपक शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बोरिवली येथे राहणाऱ्या श्रेयश शिंदे यांनी पहिल्या प्रयत्नात सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील कादवण या छोट्याशा गावातून आलेल्या श्रेयश शिंदे याने सीए परीक्षा उत्तीर्ण करून गावाला गौरव प्राप्त करून दिला आहे. त्याने पंचक्रोशीत सीए होण्याचा पहिला मान मिळविला आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475