जिल्हा

नवी मुंबईत शिवसेनेचा 'एकला चलो'चा नारा?

नवी मुंबईत शिवसेनेचा 'एकला चलो'चा नारा?
नवी मुंबईत शिवसेनेचा 'एकला चलो'चा नारा? फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप-सेना युतीच्या चर्चेत आम्हाला डावलले जात आहे. आम्हाला देखील कुठे इच्छा आहे भाजपसोबत जाण्याची. त्यामुळे आले तर ठीक नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपा-शिवसेना आता स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अर्ज दाखल अंतिम दिवसाच्या पूर्वसंध्येपर्यंत शिवसेना-भाजपा युतीच्या चर्चेची गुऱ्हाळे सुरूच होती. तर दुसरीकडे या दोन पक्षातील काही उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज देखील भरले. नवी मुंबईत शिवसेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध होता. त्यामुळे आता ही युती तुटल्यातच जमा असून असे स्पष्ट संकेत जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिले. नवी मुंबईत युतीबाबत चर्चा सुरू असताना आम्हाला युतीत डावलले जात असून आम्हाला देखील युतीची इच्छा नाही. त्यामुळे आमचे १११ उमेदवार तयार असून त्यांच्या अर्जांची छाननी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अशीच वेळ आली तर आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकू देखील, असे मत किशोर पाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपा-शिवसेना आता स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475