महाराष्ट्र

नाईकांना आयात करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली

नाईकांना आयात करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली
नाईकांना आयात करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खा. राजन विचारे यांना कडवी लढत देऊन हा मतदार संघ शिवसेनेकडे कायम राहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार संजीव नाईक यांना धनुष्यबाणावर निवडणूक लढविण्याची ऑफर दिली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. यावर नाईक परिवार कोणती भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागावाटप चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिष्ठेचा करून तो पदरात पाडून घेतला. या मतदार संघातून माजी आमदार रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्याचे देखिल निश्चित झाले असतानाच भाजपामधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार संजीव नाईक यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविण्याची सूचना केली आहे. श्री.नाईक हे सध्या भाजपात आहेत. या मतदार संघातील ते भाजपचे प्रबळ दावेदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडे गेल्यामुळे श्री.नाईक यांना मतदारसंघ राहिला नाही तर खा. विचारे यांना कडवी लढत देणारा उमेदवार शिंदे गटाकडे नाही, त्यामुळे चिन्हाची अदलाबदल करून हा मतदारसंघ युतीच्या माध्यमातून जिंकण्याची खेळी केली जाणार आहे. संजीव नाईक हे भाजपामध्ये आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू नये, असे भाजपाला वाटत असून हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाकडे खेचून आणण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये अमित शाह यांना गळ घालणार आहेत. दरम्यान हा मतदारसंघ शिवसेनेने सोडला नाही तर नाईक परिवार कोणती भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475