जिल्हा

ठाण्यात शिवसेना-मनसेचा जल्लोष

ठाण्यात शिवसेना-मनसेचा जल्लोष
ठाण्यात शिवसेना-मनसेचा जल्लोष फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बुधवारी ठाकरे बंधूंनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत युती झाल्याचे जाहिर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला शहर प्रमुख समिक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा, विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळुन फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475