जिल्हा

कल्याण पश्चिमेत शिवसेना उमेदवाराचे काम करणार नाही

कल्याण पश्चिमेत शिवसेना उमेदवाराचे काम करणार नाही
कल्याण पश्चिमेत शिवसेना उमेदवाराचे काम करणार नाही फोटो: ठाणे वैभव
भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार कल्याण: महायुतीच्यावतीने कल्याण पश्चिमेच्या जागेची घोषणा करण्यात आलेली नाही. या ठिकाणी शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार असून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची जास्त शक्यता आहे. मात्र कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे काम न करण्याचा निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला असून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात शिवसेना कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांचे काम न केल्यामुळे हा पराभव पत्करावा लागला असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 2014 साली कल्याण पश्चिम विधानसभेत भाजपाचे नरेंद्र पवार हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2019 ला मात्र ही जागा शिवसेनेला देण्यात आली. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे काम भाजपा कार्यकर्त्यांनी मन लावून केले. परिणामी भोईर हे या निवडणुकीत विजयी झाले. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम न केल्याने भाजपामध्ये नाराजी असून कल्याण पश्चिम ही जागा भाजपाचीच असून माजी आमदार नरेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ही जागा भाजपाला जाते की शिवसेनेकडे राहते, की नरेंद्र पवार कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475