जिल्हा
महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसंग्राम लढणार - डॉ ज्योती मेटे
महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसंग्राम लढणार - डॉ ज्योती मेटे
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाअध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांची बैठक झाली. यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसंग्राम या निवडणुका लढणार असल्याचे या बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी दिली आहे.
नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसंग्रामची महत्वपूर्ण बैठक शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीसाठी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अनुषंगाने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली आणि आगामी महानगरपालिका निवडणुका शिवसंग्राम लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या वतीने लढणार असल्याची घोषणा यावेळी डॉ. ज्योती मेटे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आणि मुंबई ठाणे भिवंडी आणि नवी मुंबई येथील ज्या प्रभागात शिवसंग्रामचे प्राबल्य आहे. त्या जागा शिवसंग्राम लढणार असल्याचे डॉ.मेटे यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475