जिल्हा

बदलापूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शिंदे यांच्या शिवसेनेत

बदलापूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शिंदे यांच्या शिवसेनेत
बदलापूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शिंदे यांच्या शिवसेनेत फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: मागील आठवड्यात कॉंग्रेस शहर अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे संजय जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संजय जाधव यांच्यासह काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. संजय जाधव यांनी सोमवारी काँग्रेस शहर कार्यालयात येऊन शहराध्यक्ष पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आतापर्यंत मिळालेल्या सहकार्यासाठी त्यांनी पक्षाचे आभार मानले. तसेच राजीनाम्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश न करता उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र राजीनाम्यानंतर काही तासातच जाधव शिवसेनेत किंवा भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यांना प्रवेशासाठी शिवसेना व भाजपकडून ऑफर असल्याचीही चर्चा होती. जाधव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. असे असताना बुधवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बदलापुरात शिंदे सेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी संजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर करून त्यांचे स्वागत केले. कोणतीही अपेक्षा न बाळगता हा प्रवेश केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475