जिल्हा
शीतल खरटमल यांना आशियाई सुमो कुस्तीत कास्य
शीतल खरटमल यांना आशियाई सुमो कुस्तीत कास्य
फोटो: ठाणे वैभव
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा
ठाणे: ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या शीतल खरटमल यांनी बँकॉक येथे झालेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
शीतल खरटमल यांची पुढील वर्षी किरगिस्तान येथे होणाऱ्या वर्ल्ड कॉम्बॅट गेम्ससाठी निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल भारतीय सुमो रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष यतीश बंगेरा आणि सचिव चंद्रशेखर शिंदे व प्रशिक्षक अजय साबळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
शीतल या ठाणे ग्रामीण पोलीस दलात 2010 पासून कार्यरत असून या आधी 29 वेळा त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून वेगवेगळ्या स्पर्धेत 76 सुवर्णपदके ,46 रजतपदके, 16 कास्यपदके प्राप्त केली आहेत. त्यांचे मूळ गाव सोलापूर शहर असून शालेय शिक्षण श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर येथे झाले आहे. वालचंद आर्ट अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. मार्शल आर्ट प्रकारात त्यांनी ब्लॅक बेल्ट थर्ड डिग्री घेतले आहे. अनेक शासकीय व निमशासकीय 46 पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475