जिल्हा

शीतल इरमाळीला राज्य भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण

शीतल इरमाळीला राज्य भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण
शीतल इरमाळीला राज्य भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण फोटो: ठाणे वैभव
पूर्वा गोसावीला कांस्यपदक बदलापूर: बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर माध्यमिक विभागातील बारावीत शिक्षण घेत असलेल्या शितल इरमाळी हिने भारोत्तोलन क्रीडा प्रकारात राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावले तर पूर्वा गोसावीने कांस्यपदक पटकावले. सातारा येथे 3 फेब्रुवारी रोजी छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, आयोजित राज्यस्तरीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत शितल इरमाळीने 76 किलो वजनी गटात एकूण 223 किलो वजनाची यशस्वी उचल करत सुवर्णपदक पटकावले. या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच स्पर्धेत आदर्श विद्या मंदिरातील बारावीतील पूर्वा गोसावी हिने देखील उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक प्राप्त केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना शाळेचे क्रीडा शिक्षक डेंगाणे, फिरके यांनी मार्गदर्शन केले. इरमाळी आणि गोसावी या दोन विद्यार्थिनींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव तुषार आपटे, उपाध्यक्ष जनार्दन घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जोशी, उपमुख्याध्यापक रमेश बुटेरे यांनी शितल व पूर्वा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475