जिल्हा
राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शौर्या अंबुरे सर्वोत्तम
राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शौर्या अंबुरे सर्वोत्तम
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील ॲथलीट शौर्या अंबुरे हिला ओरिसा भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षाखालील मुलींच्या वयोगटातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार मिळाला.
शौर्या हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत १०० मीटर अडथळा शर्यतीत १३.८६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक मिळविले तसेच १०० मीटर धावण्यात रजत पदक व ४x१०० मीटर रिले स्पर्धेत महाराष्ट्राला रजत पदक मिळवून आणले.
शौर्याची निवड बहरीन येथे होणाऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेकरिता झाली आहे. शौर्या सध्या दिल्ली येथे शिबिरात आहे. पुढील आठवड्यात २२ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ती बहरीनकरिता भारतीय चमूबरोबर रवाना होईल. तिच्या मेहनतीमागे तिचे मार्गदर्शक अजित कुलकर्णी यांची मेहनत आणि तिचे आईवडिल डीसीपी (पोलीस) यांच्या पूर्ण पाठींब्याने शक्य झाले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475