जिल्हा

सरन्यायाधीश अवमाननेचा शरद पवार गटाकडून निषेध

सरन्यायाधीश अवमाननेचा शरद पवार गटाकडून निषेध
सरन्यायाधीश अवमाननेचा शरद पवार गटाकडून निषेध फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी याने भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠता आव्हाड यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. सर्व कार्यकर्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसेच हातात संविधानाच्या प्रति घेऊन बसले होते. या आंदोलनात शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, शहर युवक अध्यक्ष अभिजित पवार, शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, राजेश कदम, मकसूद खान, गजानन चौधरी, राजू चापले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475