जिल्हा

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे आंदोलन

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे आंदोलन
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे आंदोलन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष केदार दिघे हे देखील उपस्थित होते. यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत. आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. मनोज प्रधान म्हणाले की, आजचं जे आंदोलन आहे, ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोकं स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले आहेत. या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी, महिलाध्यक्ष, नगरसेविका मनिषा भगत, युवक अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजित पवार, नगरसेविका पल्लवी जगताप, मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475