जिल्हा

शहापूरच्या सांस्कृतिक विकासाला नाट्यगृहाची आस

शहापूरच्या सांस्कृतिक विकासाला नाट्यगृहाची आस
शहापूरच्या सांस्कृतिक विकासाला नाट्यगृहाची आस फोटो: ठाणे वैभव
प्रशांत दामले यांच्याकडे साकडे शहापूर : शहापूर तालुक्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे या मागणीसाठी दिव्य वीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार थोरात यांनी गुरुवारी माटुंगा येथे प्रशांत दामले यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. शहापूर तालुक्यात आजपर्यंत दर्जेदार व सुसज्ज नाट्यगृह उपलब्ध नसल्याने स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था, सांस्कृतिक मंडळे आणि रसिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी तसेच नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, शालेय-महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा, साहित्यिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र, आधुनिक सुविधांनी युक्त नाट्यगृहाची नितांत आवश्यकता असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले. यावेळी प्रशांत दामले यांनी निवेदनाची दखल घेत या मागणीचा संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून शहापूरमध्ये सुसज्ज नाट्यगृह उभारणीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितल्याची माहिती वैशाली पाटील यांनी दिली. शहापूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या तालुक्यात सुसज्ज नाट्यगृह उभारल्यास स्थानिक कलाकारांना कायमस्वरूपी व्यासपीठ मिळेल, सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळेल आणि नवोदित कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी सक्षम मंच उपलब्ध होईल असा विश्वास वैशाली पाटील व किरणकुमार थोरात यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर अनेक सांस्कृतिक उपक्रम होत असले तरी दर्जेदार नाट्यगृहाच्या अभावामुळे अनेक कार्यक्रम इतर शहरांत आयोजित करावे लागतात. त्यामुळे शहापूरमध्ये लवकरात लवकर आधुनिक सुविधांनी सुसज्ज नाट्यगृह उभारण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475