जिल्हा

हल्लेखोर फेरीवाल्याला सात वर्षांची सक्तमजुरी

हल्लेखोर फेरीवाल्याला सात वर्षांची सक्तमजुरी
हल्लेखोर फेरीवाल्याला सात वर्षांची सक्तमजुरी फोटो: ठाणे वैभव
महिला सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला प्रकरण ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भागवत यांनी सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. अमरजीत यादव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या कल्पिता पिंपळे या सहाय्यक आयुक्त होत्या. या प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे तसेच बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात ते कारवाई करत असत. त्यांच्या कडक कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते. ३० ऑगस्ट २०२२ला रात्रीच्या वेळी सहाय्यक आयुक्त श्रीमती पिंपळे या कासारवडवली भाजी मार्केट येथे फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अतिक्रमण विरोधी पथकातील एका कर्मचाऱ्याने सहाय्यक आयुक्त पिंपळे यांना फेरीवाल्यांची माहिती दिली. त्या कासारवडवली येथिल भाजी मार्केट येथे अमरजीत यादव यांच्या हातगाडीवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता फेरीवाला अमरजीत यादव याने विरोध करुन त्याच्या हातात असलेल्या तीक्ष्ण हत्याराने सहाय्यक आयुक्त श्रीमती पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली होती. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले होते. या हल्ल्याबाबत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने २१ साक्षीदार तपासले. त्यामध्ये स्वतः फिर्यादी श्रीमती पिंपळे, सोमनाथ पालवे आणि डॉ.लाड यांची साक्ष महत्वाची ठरली. या सर्व साक्षी-पुराव्याच्या आधारे न्यायमूर्ती श्री.भागवत यांनी आरोपी यादव याला सात वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी श्रीमती पिंपळे यांची बाजू सक्षमपणे मांडली. त्यामुळे आरोपीला शिक्षा झाली. याबाबत सरकारी वकील श्री. हिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होणे आवश्यक होते, परंतु त्याला सात वर्षांची शिक्षा देण्यात आली असून तिला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ॲड. शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले. या खटल्यात ॲड.विजय मुंडे, ॲड. संजय कोकणे, ॲड. राजहंस गिरासे यांनी सहकार्य केले, अशी माहिती ॲड. हिरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475