जिल्हा

स्कायवॉकखाली गांजा विक्री; छापेमारीत ७०० ग्रॅम माल जप्त

स्कायवॉकखाली गांजा विक्री; छापेमारीत ७०० ग्रॅम माल जप्त
स्कायवॉकखाली गांजा विक्री; छापेमारीत ७०० ग्रॅम माल जप्त फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील संजय गांधीनगर परिसरात स्कायवॉकखाली सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीवर मध्यवर्ती पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सुमारे ७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या पथकाने उशिरा रात्री छापेमारी करत आरोपीला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे. शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, पोलिस शिपाई किशोर काळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री सुमारे दीड वाजता वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे व तुकाराम पादिर यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कोबरने, विलास मालशेट्टे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जप्त करण्यात आलेला गांजा आरोपीपर्यंत कसा पोहोचला आणि यामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475