जिल्हा
'बहुद्देशीय बॅग'ची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
'बहुद्देशीय बॅग'ची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: आजकाल शाळा, कॉलेज व नोकरीसाठी कामावर जाणाऱ्यांसाठी बॅग ही अविभाज्य घटक बनली आहे. मात्र ही बॅग अधिक बहुद्देशीय कशी बनेल? याचा विचार करून इलेश राजू माला याने बनविलेली बॅग आज चर्चेचा विषय बनली असून त्याची बॅग आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास पात्र ठरली आहे.
साकेत महाविद्यालय, कल्याण येथे प्रेरणा पुरस्कार मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. यात नवी मुंबई महानगरपालिका श्री दत्त विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्र. १८ आणि माध्यमिक शाळा क्र. ११६ सानपाडा शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या इलेश राजू माला या विद्यार्थ्याने बनविलेली बहुउदेशीय बॅग या प्रकल्पाची भंडारा येथे २७ नोव्हेंबर २०२५ रोजी भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या बॅगेत सोलर यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्ज करता येईल तसेच चोर बॅग कापू नये म्हणून आतील भागात स्टील जाळी, बॅग घेऊन एखादी व्यक्ती हरवल्यास त्यात बसवलेल्या जीपीएस प्रणालीद्वारे शोध घेता येऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे या बॅगेत एअर बॅग बसवली आहे. जेणेकरून दुचाकी चालवत असताना अपघात झाला तर एअर बॅगमुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे इलेश राजू माला या विद्यार्थ्याने बनविलेल्या बॅगची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
300x450
300x600