जिल्हा

थंडीची चाहूल लागताच सीगल पक्षी ठाण्यात दाखल

थंडीची चाहूल लागताच सीगल पक्षी ठाण्यात दाखल
थंडीची चाहूल लागताच सीगल पक्षी ठाण्यात दाखल फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात परदेशी पाहुण्यांचे आगमन ठाणे: हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पाहुणे ठाण्यात दाखल झाले आहेत. उत्तर युरोप आणि सायबेरिया या अतिथंड प्रदेशातील 'सीगल' पक्षांचे ठाण्यात आगमन झाले आहे. ठाण्यातील खाडी किनारी आणि तलावावर या पक्षांचे थवे उतरले असून त्यांना पाहण्यासाठी नागरिकांसह लहान मुले गर्दी करत आहेत. सीगल पक्षी साधारणपणे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात येऊ लागतात आणि फेब्रुवारीअखेर किंवा काही वेळा मार्चच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत थांबतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील विशेषतः ठाणे, मुंबई-नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यांवर ही पक्षी स्थायिक होतात. सुमारे साडेतीन ते चार महिने या पक्षांचा हा प्रवास सुरू राहतो. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा पक्ष्यांची संख्या थोडी जास्त आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. या पक्षांना पाहण्यासाठी ठाणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या सीगल पक्षांचे फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची ओढ लागली असून संध्याकाळी ठाण्यातील चौपाटी, तलावपाळी आणि उपवन तलाव येथे नागरिक आवर्जून उपस्थित राहतात. यावेळी पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक नागरिक त्यांना ब्रेड, फरसाण सारखे पदार्थ खाऊ घालत आहेत. मात्र ते त्यांचे खाद्य नसून नागरिकांनी त्यांना बाहेरील खाद्य देऊ नये. हे खाद्य त्यांच्या शरीराला हानिकारक असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475