जिल्हा

साकेत उड्डाणपूलाची दुरूस्ती पूर्ण; अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत

साकेत उड्डाणपूलाची दुरूस्ती पूर्ण; अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत
साकेत उड्डाणपूलाची दुरूस्ती पूर्ण; अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण झाले असून हा पूल आता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. साकेत उड्डाणपूलाच्या एक्स्पान्शनमधील बेरिंगचा पार्ट 23 ऑगस्ट रोजी निखळल्याने पूल अधिक हलू लागला होता. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला होता. तर पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. दुरूस्तीचे काम सुरू झाल्यानंतर या कालावधीत मात्र या मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर या दुरुस्तीच्या कामासाठी अभियंत्यांची टीम आणि अधिकचे कर्मचारी वापरून हा या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम सात दिवसांच्या ऐवजी चार दिवसांतच पूर्ण करण्यात एमएसआरडीसीला यश आले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पुलावरील नाशिककडची एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा फटका वाहनचालकांना बसत होता. एकीकडे खड्डे आणि रस्त्याचे काम यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे आधीच येथून प्रवास करणे जिकरीचे बनले असताना दुरुस्तीच्या कामामुळे नागरीक हैराण झाले होते. मात्र वेळेपेक्षा आधी दुरूस्तीचे काम होऊन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून पूल वाहतुकीसाठी व्यवस्थित आहे.त्यामुळे रविवारी मध्यरात्री पासून पुलावरील अवजड वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475