जिल्हा

लाच घेताना आरटीओ निरीक्षक ताब्यात

लाच घेताना आरटीओ निरीक्षक ताब्यात
लाच घेताना आरटीओ निरीक्षक ताब्यात फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक वर्ग दोनचे निळोबा तांदळे (५४) आणि सुनील भोईर ही खाजगी व्यक्ती या दोघांना ठाणे अँटीकरप्शन ब्युरोकडून रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेतील तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीचे वाहन तक्रारदार तलासरी (दापचरी) आर.टी.ओ. चेकपोस्ट येथून गुजरातच्या दिशेने घेऊन जात होते. त्यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक तांदळे यांनी त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार न पाडता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी खाजगी इसम सुनील भोईर याच्यामार्फत त्यांच्या समक्ष तक्रारदारकडून चेक पोष्ट पास करण्याकरिता ३०० रुपयांची मागणी करून स्वीकारली. ही रक्कम सायंकाळी ४.५८ वाजता स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध पालघर जिल्हा येथील तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475