जिल्हा

बसची रोप वे वाहतूक; राज्यात प्रयोग करणार!

बसची रोप वे वाहतूक; राज्यात प्रयोग करणार!
बसची रोप वे वाहतूक; राज्यात प्रयोग करणार! फोटो: ठाणे वैभव
पदभार स्विकारल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पत्रकारांशी संवाद मुंबई : बंगळुरूच्या धर्तीवर १५ ते १६ सीटच्या बसेस रोपवेद्वारे एमएमआर क्षेत्रात सुरु केल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. या दृष्टीने वाहतूक व्यवस्था करता येईल का यासाठी माझा प्रयत्न असेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मंत्रालय येथील दालनात पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. रस्ते वाहतुकीबरोबर हवेतील वाहतुकीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. बंगळुरू रोप वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. बंगळुरूच्या रोप वे वाहतुकीचे निरीक्षण करून त्यांचा अहवाल तयार करण्यात येईल. त्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट परिवहन विभाग तयार करेल. तो दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. गुजरातमधील बस डेपो अत्याधुनिक आहेत. तसेच कर्नाटकची प्रवासी वाहतूक अत्यंत सुसज्ज आहे. या दोघांचीही पाहणी करण्यात येईल. इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यात कशा राबवता येतील या दृष्टीने परिवहन विभाग कार्य करेल, असेही श्री.सरनाईक म्हणाले. हवेतील प्रवासी वाहतूक आपण सुरू केली तर महाराष्ट्र राज्य हे देशातील एक नंबरचे राज्य ठरेल. नफा कमवणारी परिवहन सेवा म्हणून आपल्या राज्याची नवी ओळख निर्माण होईल. हे माझे व्हिजन असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. टप्पा टप्प्याने या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्याच्या परिवहन विभागाला अत्याधुनिक, सुसज्ज अशी दिशा देण्यात येईल, असेही ते म्हणाले. वयोवृद्ध आणि महिलांना ५० टक्के सवलत याप्रमाणे अनेक हितकारक निर्णय घेतले जातील, असे श्री.सरनाईक यांनी सांगितले. राज्यातील जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. राज्य परिवहन विभागाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळात सुसूत्रता आणायची आहे. एसटी तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर मी तशी नक्की भूमिका घेणार असल्याचे श्री. सरनाईक यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475