महाराष्ट्र

भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा

भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा
भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : ताडाळी गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या तिघा दरोडेखोरांनी माजी नगराध्यक्षा असलेल्या महिलेस धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 21 लाखांचा ऐवज लंपास केला. या दरोड्याने भिवंडी परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना चौधरी या कुटुंबासोबत राहतात. सोमवारी मध्यरात्री एक ते चारच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून दरोडेखोर आत शिरले. यामध्ये 20 ते 35 वयोगटातील तिघांचा समावेश होता. या तिघा चोरट्यांनी साधना चौधरी झोपलेल्या बेडरूममध्ये प्रवेश करून त्यांच्यावर लोखंडी कटावणी उगारुन मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉकरमधील 50 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 95 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून साधना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिस ठाण्यात जबरी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बंगल्याच्या परिसरात येताना व जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475