जिल्हा
मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा
मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा
फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांच्या निर्णयावर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले आहे. काही वर्षापूर्वी मनसेत प्रवेश करण्याआधी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकली होती.
कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत झालेल्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेत कोणत्या पक्षाचे वर्चस्व दिसून येते. संबंधित प्रभागात कोणत्या पक्षाबरोबर गेल्यावर निर्विवाद विजय मिळेल याचे ठोकताळे मांडले जात आहेत. त्याप्रमाणे आता पक्ष काही माजी नगरसेवक पक्ष बदल करीत आहेत. मागील आठवड्यात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात मनसेचे माजी नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या या प्रभागात स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास निधी देऊन प्रभागाचा विकास करण्यावर आम्ही ठाम आहोत, असे आश्वासन येथील लोकांना दिले आहे. त्यानंतर लागलीच थोड्याच दिवसात प्रकाश भोईर हे मनसे सदस्यत्वाचा राजीनामा देतात यामुळे येथील स्थानिक नागरिक भोईर हे कोणत्या पक्षात जाणार याचे संकेत जुळवत आहेत. मुख्य म्हणजे आमचे कार्यकर्ते कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरवणार आहेत असे खुद्द प्रकाश भोईर खाजगीत सांगत असल्याने येत्या शनिवारी किंवा रविवारी प्रकाश भोईर भाजपाचे कमळ हातात घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475