महाराष्ट्र

निवासी डॉक्टर संपावर; नियमित शस्त्रक्रिया वाऱ्यावर

निवासी डॉक्टर संपावर; नियमित शस्त्रक्रिया वाऱ्यावर
निवासी डॉक्टर संपावर; नियमित शस्त्रक्रिया वाऱ्यावर फोटो: ठाणे वैभव
कळवा रुग्णालयात बाहयरुग्ण विभागावर परिणाम ठाणे: कोलकत्ता घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे ३०० पेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेल्याने याचा मोठा परिणाम रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर झाला आहे. रुग्णालयात नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलल्या असून डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाहयरुग्ण विभागावर देखील परिणाम झाला आहे. कोलकता येथील सरकारी रुग्णालयात निवासी बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारला आहे. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास ३०० निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवल्या. याचदरम्यान या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. हे प्रकरण सीबीआय यंत्रणेकडे द्यावे आणि डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी कठोर कायदा आणला पाहीजे, अशी मागणीही केली. चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर यांचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण आला आहे. निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाहयरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. सध्या कळवा रुग्णालयातील बाहयरुग्ण विभागात २१३० रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे. याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियोजन करताना रुग्णलाय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475