जिल्हा

ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या चितळाची सुटका

ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या चितळाची सुटका
ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलेल्या चितळाची सुटका फोटो: ठाणे वैभव
ठाणे : सोमवारी भरकटलेले चितळ (हरीण) कासारवडवली एमबीसी पार्क येथील ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकून पडले होते. उद्यानातील वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या हरणाला पकडून पुन्हा त्याच्या अधिवासात सोडले आहे. कासारवडवली एमबीसीपार्कच्या ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एक चितळ (मादी) जातीचे हरीण आल्याची माहिती वन विभागला मिळाली. हरिणाला जंगलात जाण्याचा रस्ता समजत नसल्याने काहीसे घाबरलेले होते. यावेळी वन विभागाला हरणाची माहिती मिळताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. येऊर येथील वन परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली या हरणाला पकडून पुन्हा जंगलात सोडले असल्याची माहिती परिमंडळ वन अधिकारी रमाकांत मोरे यांनी दिली. हरणाला पकडल्यानंतर प्रथम वन विभागाच्या पशूवैद्यक अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी हरणाची तपासणी केली. त्यानंतर त्याच्या अधिवासात सोडले. यावेळी रेस्क्यू टीममध्ये परिमंडळ वन अधिकारी रमाकांत मोरे, सुभाष चव्हाण, विनोद ठाकूर वैभव पाटील आदी कर्मचारी होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475