जिल्हा
राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी साहिलची निवड
राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी साहिलची निवड
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या साहिल हुसेन लदाफ याची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनी परेड संचालनासाठी निवड झाली.
कठोर परिश्रम आणि प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर साहिल हुसेन लदाफ याला हे यश मिळाले. मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताकदिन संचालन शिबिर २०२४ साठी मुंबई विद्यापीठातर्फे परेड संचलनात स्वयंसेवक म्हणून निवड झाली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बाबासाहेब कांबळे, डॉ.मनोज वाघ, प्रा.फरहत खान यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ.गणेश भगुरे आणि संस्थेचे सचिव कमलेश प्रधान यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475