जिल्हा

नोंदणी ३६ हजारांच्या घरात; प्रत्यक्षात प्रसूती २२ हजार

नोंदणी ३६ हजारांच्या घरात; प्रत्यक्षात प्रसूती २२ हजार
नोंदणी ३६ हजारांच्या घरात; प्रत्यक्षात प्रसूती २२ हजार फोटो: ठाणे वैभव
उर्वरित महिलांची माहिती घेण्याची जबाबदारी आशा सेविकांवर ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध रुग्णालयात प्रसूतीसाठी ३६ हजार महिलांनी पूर्व नोंदणी केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र २२ हजार महिलांची प्रसूती झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित गर्भवती महिलांची माहिती घेण्याची जबाबदारी आशा सेविकांवर टाकण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दप्तरी दरवर्षी ३५ ते ३६ हजार गर्भवतींची नोंदणी होत असते. त्यातील २२ हजारांच्या आसपास मातांची महापालिका हद्दीत प्रसुती देखील होते. यापैकी आठ हजारांच्या आसपास मातांची महापालिकेच्या रुग्णालयात तर इतर महिलांची खासगी रुग्णालयात प्रसूती होत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महापालिका हद्दीत प्रसूती न झालेल्या मातांचा शोध घेणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महापालिका हद्दीत रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदणी केली जाते. मात्र नोंदणीनंतर काही माता दुसरीकडे जातात. त्या कुठे जातात, त्यांच्या प्रसूतीची स्थिती कशी आहे, याची माहिती आशा वर्कर घेणार आहेत. यासाठी प्रत्येक मातेमागे आशा वर्करला १०० रुपये महापालिका देणार आहे. आशा वर्करकडून प्रसूतीच्या मातांची १२ आठवड्याच्या आत नोंदणी करण्यासाठी देखील मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार यासाठी प्रत्येकी २५ रुपये दिले जाणार आहेत. यात नोंद झाली नसेल तर नोंदणीसाठी देखील या आशा वर्कर मदत करणार आहेत. काही महिलांना जुळे होणार असते, काहींना प्रसूती दरम्यान विविध त्रास होत असतात. प्रसूतीचे निदान झाल्यानंतर आई आणि बाळाची तब्येत चांगली आहे किंवा काही त्रास आहे का? याची तपासणी करणे गरजेचे असते. ते काम आशा वर्करच्या माध्यमातून झाल्यास त्यापोटी प्रती ५०० रुपये दिले जाणार आहेत. अडचणीच्या प्रसूतीसाठी महापालिकेच्या कोपरी येथील प्रसूतीगृहात १२ खाटा एनआयसीयु आणि सहा खाटा स्टेप डाऊनच्या असणार आहेत. तसेच आठ तास प्रसूतीतज्ञ देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोपरी, वर्तक, मुंब्रा, कौसा आदी ठिकाणी देखील ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475