जिल्हा
नकली पोलिसांच्या टोळीसह रील स्टारला अटक
नकली पोलिसांच्या टोळीसह रील स्टारला अटक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई
ठाणे : डोंबिवलीतील रिल स्टार सुरेंद्र पाटील (50) चोळेगाव, डोंबिवली याच्यावर दोन विनापरवाना पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे मिळून आल्या प्रकरणी डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाणे खंडणी विरोधी पथकाने सुरेंद्र पाटील याच्यासह चार जणांना अटक केली आहे.
डोंबिवलीतील वादग्रस्त तथाकथित वादग्रस्त रिल स्टार सुरेंद्र पाटील यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने 25 नोव्हेंबर रोजी बेकायदेशीर पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसासह डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मर्सडीज बेंज कारसह ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यास तत्काळ अटक करून त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या गुन्हा पुढील तपास करीत असतांना गंभीर प्रकार समोर आला.
काही जण सुरेंद्र पाटील यांना बनावट नोटा तयार करून देणार होते. बनावट नोटा बनवून देणाऱ्या एका टोळीने सुरेंद्र पाटील याच्याकडून एक कोटी 60 लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात चाळीस लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सुरेंद्र पाटील हा आपल्या कारमधून चाळीस लाख रुपये घेऊन मुरबाड येथील एका फार्म हाऊसवर गेला होता. यावेळी काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वतःकडे दोन विनापरवाना पिस्तूल ठेवले होते. त्यावेळी नोटा बनवून देणारे त्यांचे इतर पाच साथीदार तेथे आले. या टोळीने स्वतः पोलीस असल्याचे सांगून पोलिसांची रेड पडल्याचे भासवून पाटील याच्याकडील 40 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला होता.
ठाणे खंडणी विरोधी पथकाने चाळीस लाखाची रक्कम लुटून नेणाऱ्या चार जणांना भिवंडी आणि वाडा परिसरातून अटक केली. या टोळीकडून लुटून नेलेल्या चाळीस लाखापैकी 14 लाख 35 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475