जिल्हा

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची बंडखोरी

शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची बंडखोरी
शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची बंडखोरी फोटो: ठाणे वैभव
कल्याण पूर्व मतदार संघात दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज कल्याण : कल्याण पूर्व मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पूर्वेतून महायुतीच्या वतीने भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली असून, कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. कल्याण पूर्वेत कोणताही विकास झाला नसल्याची जनसामान्यांची भावना आहे. कल्याण पूर्व भकास झाला असून पूर्वेचा विकास करण्यासाठी जनसामान्यांनी मला पुढे आणलं आहे. महायुतीच्या नेत्यांना वारंवार सांगून देखील त्या कुटुंबात उमेदवारी दिल्याने आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी सकाळी गुंजाई चौकातून महेश गायकवाड यांनी हजारो समर्थकांच्या सहभागाने शक्तीप्रदर्शन करीत प्रभाग ड कार्यालय येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डिजे तसेच ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत महिलांपेक्षा पुरुष मंडळींची उपस्थितीत प्रखर्षाने जाणवली. या रॅलीत शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुशिला माळी, संगिता गायकवाड, राजाराम पावशे, शरद पावशे आदी माजी नगरसेवक तसेच असंख्य पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600