जिल्हा

री-डिव्हलपमेंट एक्स्पोमध्ये नव्या घरांच्या स्वप्नांना मिळणार दिशा

री-डिव्हलपमेंट एक्स्पोमध्ये नव्या घरांच्या स्वप्नांना मिळणार दिशा
री-डिव्हलपमेंट एक्स्पोमध्ये नव्या घरांच्या स्वप्नांना मिळणार दिशा फोटो: ठाणे वैभव
तज्ज्ञ, विकासक आणि नागरिक एकाच छताखाली ठाणे: ठाणे शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा पहिलाच ‘री-डिव्हलपमेंट एक्स्पो २०२५’ आता ठाण्यात पार पडणार आहे. क्रेडाई–एमसीएचआय ठाणे तर्फे आयोजित हा दोन दिवसीय भव्य उपक्रम ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी रेमंड ट्रेड शो हॉल, ठाणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असल्याची माहिती एमसीएचआय क्रेडाई ठाणेचे पुनर्विकास समितीचे अध्यक्ष महेश बोरकर यांनी दिली. या एक्स्पोचा उद्देश ठाण्यातील पुनर्विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि तणावरहित करणे हा आहे. यासाठी नागरिकांना नामांकित विकासक, वास्तुशास्त्र तज्ज्ञ, कायदेशीर सल्लागार, वित्तीय तज्ज्ञ आणि रेरा अधिकारी यांच्याशी एकाच छताखाली संवाद साधण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी सोसायटी प्रतिनिधींना विविध विकासकांकडून मिळणाऱ्या प्रस्तावांची तुलना, कायदेशीर बाबी, वित्तीय योजना, तसेच डिझाइन आणि नियोजन याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाणार आहे. पुनर्विकासाशी संबंधित शंका-समस्यांवर तज्ज्ञांकडून थेट समाधान मिळेल. या एक्स्पोचे उद्घाटन ठाण्याचे आयुक्त, पोलीस आयुक्त आणि खासदार यांच्या हस्ते होणार असून महापालिकेचे प्रभारी नगर संचालक कुणाल मुळे देखील सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. रिडेव्हलपमेंट प्रकल्पातील अडथळे, त्यांचे विश्लेषण आणि प्रकल्प यशस्वी करण्याचे मार्ग या विषयांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. एमसीएचआय क्रेडाई ठाणेचे पुनर्विकास समितीचे अध्यक्ष महेश बोरकर म्हणाले, “रिडेव्हलपमेंट हा ठाण्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अपरिहार्य पर्याय आहे. नागरिकांना योग्य माहिती, मार्गदर्शन आणि जागरूकता मिळावी, हा या एक्स्पोचा मुख्य हेतू आहे.” दोनपेक्षा अधिक गृहसंकुलांचा संयुक्त पुनर्वसन (Joint Redevelopment) या संकल्पनेवरही या सत्रात विशेष भर दिला जाणार आहे. या मॉडेलमुळे प्रशस्त जागा, उत्कृष्ट सुविधा आणि सामाईक हित साध्य होते, असे श्री.बोरकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475