जिल्हा

डोंबिवलीमध्ये तिबोटी खंड्याचे पुन्हा दर्शन

डोंबिवलीमध्ये तिबोटी खंड्याचे पुन्हा दर्शन
डोंबिवलीमध्ये तिबोटी खंड्याचे पुन्हा दर्शन फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत पुन्हा एकदा तिबोटी खंड्याचे दर्शन झाले असून जखमी झालेल्या या पक्षाला वनखात्याच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तिबोटी खंड्या हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका इ. देशातून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात. यावेळी पावसाळा लांबला असल्याने पक्षी सध्या परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. असाच एक पक्षी बुधवारी सँडीज किचन हॉटेल गणेश चौक, गोपी मॉलजवळ, डोंबिवली पश्चिम येथे पंख्यात अडकलेला होता. पॉज संस्थेच्या ऋषिकेश सुरसे यांनी त्याला वाचवून, प्रथमोपचार करून पॉज संस्थेने कल्याण वन खात्याकडे सुपुर्द केले. हा पक्षी पंखाला लागल्याने जखमी असून त्याला पुढील पुनर्वसनसाठी वनखात्याच्या सेन्टरला ठेवले जाईल, असे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे ह्यांनी सांगितले. हा किंगफिशर बहुरंगी असल्याने तो वन्यजीव छायाचित्रकारांसाठी एक पर्वणी असते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475